शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

फॉर्मात आलेल्या राष्ट्रवादीत ऐन प्रचाराच्या काळात सावळा गोंधळ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 17:56 IST

एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला आलेली मरगळ आणि दिग्गज नेते सोडून गेल्यामुळे गलीगात्र झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षप्रमुख शरद पवार यांनी उभारी देण्याचे काम केले. पवारांच्या झंझावाती दौऱ्यांमुळे तरुणांमध्ये पवारांविषयी आकर्षण वाटू लागले आणि त्यातून सहानुभुती तयार होऊ लागली. यामुळे राष्ट्रवादी मुसंडी मारणार अशी स्थिती निर्माण झाली असताना ऐन प्रचाराच्या काळात पक्षात सावळा गोंधळ सुरू झाल्याचं दिसत आहे.

उमेदवारी देण्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी सभेतूनच बीडचे पाच उमेदवार जाहीर करणे हा सर्वांसाठी धक्का होता. मात्र त्यातील एक उमेदवार भाजपमध्ये जाणे हे त्यापेक्षा धक्कादायक होते. या घटनेपासूनच राष्ट्रवादीत सावळ्या गोंधळाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार फुटण्याचा अनुभव याआधी बीडच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला आला होता.

एक गोंधळ संपतो ना संपतो की उमेदवारीसाठी एबी फॉर्म देण्यावरूनही गडबड झाली. तर पैठणमध्ये एकाचवेळी दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे उमेदवारांसह मतदार संघात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हा फंडा आणखी काही मतदार संघातही वापरण्यात आला होता.दरम्यान चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने उमेदवाराला एबी फॉर्मच दिला नाही. तर भोसरीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे निवडणूक न लढवता राष्ट्रवादीला काय साधायचं होतं, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित होत आहे. हे सगळं सुरू असताना राष्ट्रवादीकडून चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांना पाठिंबा देण्याची घाई करण्यात आली. मात्र काँग्रेसने यापासून स्वत:ला वेगळ करून घेतलं.

या व्यतिरिक्त खुद्द अजित पवारांनी सोलापूरमधील राष्ट्रवादीच्याच दोन उमेदवारांविरुद्ध भूमिका घेतली. या दोघांना राष्ट्रवादीने खुद्द उमेदवारी जाहीर केली होती. करमाळ्यातून संजय पाटील यांना तर सांगोल्यातून दीपक साळुंखे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. आता अजित पवारांवरच या उमेदवारांविरोधात भूमिका घेण्याची नामुष्की ओढवली. त्यांनी करमाळ्यात संजय शिंदे यांना तर सांगोल्यात शेकापचे अनिकेत देशमुख यांना पाठिंबा दर्शविला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविणारे संजय शिंदे आता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

एकूणच राष्ट्रवादीमधील या घडामोडी कुटनितीचा भाग असण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी वाट्याला आलेल्या जागेवर एबी फॉर्म न देणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे शरद पवारांनी फॉर्मात आणलेल्या राष्ट्रवादीत ऐन प्रचाराच्या काळात सावळा गोंधळ सुरू झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.