शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “रावण काढून श्रीराम समजावून सांगा; मुघल बाजूला काढून छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 19:53 IST

Maharashtra Politics: दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एका ट्विटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅग देत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषाबद्दल होणारी विधाने आणि वाद मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केले. त्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या व्यक्तव्याला जोडून एक वक्तव्य केले त्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटले. यानंतर आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा

जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन,कर्ण काढून महाभारतातून कृष्णअर्जुन समजावून सांगा. बाजुला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या ट्विटमध्ये आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅगही जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. 

दरम्यान, भाजपचे मनापासूनआभार मानतो. तुम्हांला धन्यवाद देतो.आमच्या यात्रेला प्रसिद्धी  तुम्ही एका तासातच मिळवून दिलीत. 'आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा' ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टिका केलीत त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाला आहे. बहुजनांचा इतिहास तुम्हांला का खुपतो? हेच आम्हांला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो, असा खोचक टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडTwitterट्विटर