शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा पराभव होणे शक्यच नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 18:57 IST

Maharashtra Political Crisis: यापूर्वी अनेकांनी बारामतीला टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.

Maharashtra Political Crisis: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी रणनीति आखण्यास हळूहळू सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे भाजप विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्नशील असून, दुसरीकडे विरोधक भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी मजबूत आघाडी करण्यावर भर देताना दिसत आहेत. यातच राज्यातही भाजपने बारामतीसह अन्य लोकसभा मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले असून, केंद्रीय नेते त्या त्या मतदारसंघात जाऊन आढावा घेत आहेत. यावर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला असून, एखाद्या वेळेस सूर्य पश्चिमेला उगवेल, पण बारामतीत शरद पवारांचा (Sharad Pawar) पराभव होणे शक्यच नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. 

एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उगवेल. मात्र शरद पवारांची साथ बारामतीकर कधी सोडणार नाहीत. बारामतीमध्ये शरद पवारांचा पराभव बारामतीकर होऊ देणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आतापर्यंत अनेकांनी बारामतीला टार्गेट केले, येथे खोदून पाहिले, पण पाणी काही लागले नाही, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. 

भाजपचे हे प्रचार तंत्र आहे

भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे यंदा 'मिशन महाराष्ट्र' बरोबर 'मिशन बारामती' असल्याचे विधान करत शरद पवार टार्गेट असल्याचे स्पष्ट केले होते. यापूर्वी अनेकांनी बारामती टार्गेट करून खोदून पाहिले, पण कोणाला पाणी लागले नाही. त्यामुळे हा प्रयत्न आजचा नाही. भाजपचे हे प्रचार तंत्र आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्याबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, वेळ लागू शकतो पण एवढा ही वेळ लागू नये,की विधानसभेची मुदत संपेल. आता याबाबत एकदा सुनावणी सुरू झाल्यास ती लवकर पूर्ण करून निर्णय दिल्यास महाराष्ट्रातील सर्व गोष्टी क्लिअर होतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवार