शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 20:31 IST

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Karnataka Election 2023: काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. यातच आता पक्षाचे अस्थित्व सिद्ध करण्यासाठी पक्षाने आगामी कर्नाटक निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकाच मतदान दिवशी होणार आहे. 10 मे रोजी मतदान आहे तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. यात राष्ट्रवादीनेही उडी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या पक्षाच्या बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता यादीही जाहीर करण्यात आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने 9 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानुसार, कोडगू (1 जागा), म्हैसूर (1 जागा), बेळगाव निपाणी (1 जागा), विजापूर (1 जागा), कोप्पळ (1), हवेरी (1), विजयनगर (1) या ठिकाणी पक्षाने आपले उमेदवार उतरवले आहेत. याशिवाय, पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांमध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, मो. फैजल आणि इतर 15 जणांची नावे आहेत.

निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीला धक्का काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीसोबतच तृणमूल काँग्रेस आणि सीपीआयचा देखील राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आला आहे. दरम्यान, आपला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार