शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच नंबर १, शरद पवारांनी आकडेवारीसह काढली भाजपाच्या दाव्यातील हवा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:14 IST

Grampanchayat Election Result: शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेत्यांकडून करण्यात येत असलेले दावे आकडेवारीसह खोडून काढत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले.

मुंबई - राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या निकालांनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाने आपल्यालाच सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा केला होता. दरम्यान, आता शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेत्यांकडून करण्यात येत असलेले दावे आकडेवारीसह खोडून काढत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगितले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचे सांगितले. 

शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाचा आवर्जुन उल्लेख केला. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत.त्याची आकडेवारी काही पक्षांकडून वेगळी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीकडे असलेली अधिकृत माहिती आम्ही सर्व जिल्ह्यांमधून एकत्रित केली आहे. या माहितीनुसार एकूण ६०८ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १७३, काँग्रेसने ८४, भाजपाने १६८ आणि शिंदे गटाने ४२ ठिकाणी विजय मिळवला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची अधिकृत आकडेवारी आम्हाला मिळालेली नाही. पण साधारणत: २७७ ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर शिंदे गट आणि भाजपाला मिळून २१० जागी विजय मिळाला आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

शरद पवार पुढे म्हणाले की, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. या निवडणुकीमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण कार्यकर्त्यांना पुढे केलं होतं. त्यांनी या निवडणुकीत केलेली कामगिरी आमच्यासाठी समाधानकारक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जास्त जागा निवडणूक आल्याचा दावा भाजपा नेते करत आहेत. मात्र तो त्यांचा भ्रम आहे. तसं असेल तर त्यांना भ्रमात राहू द्या, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाgram panchayatग्राम पंचायत