शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे"; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:50 IST

NCP Clyde Crasto Slams MNS And BJP : राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी यावरून मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरून भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांच्याविरोधात मोट उभी केली आहे. उत्तर प्रदेशात राजकारण चांगलेच तापले असताना अयोध्येत जाऊन कुणीही श्रीरामाचे दर्शन घेऊ शकतो अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ब्रिजभूषण यांनी केलेल्या विरोधाचे कारण आपणाला माहीत नसून त्यांच्याशी आपले काहीही बोलणे झाले नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी यावरून मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"भाजपा मनसेला आपल्या तालावर नाचवत आहे" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याला विरोध हा 'नूरा कुस्ती' सारखा दिसत आहे. आधी घोषणा, नंतर भाजपा खासदार ब्रिजभूषण यांचा विरोध, नंतर देवेंद्र फडणवीस जी "विरोध करू नका" सांगतात आणि त्यानंतर लगेचच मूक मनसे "अयोध्या दौरा होणार" ही घोषणा करते. भाजपा त्यांना आपल्या तालावर नाचवत आहे" असं क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नाशिकमध्ये खासगी कार्यक्रमासाठी आलेले फडणवीस यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी सावध भूमिका मांडली. उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांना उघडपणे विरोध सुरू असून जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. याविषयी त्यांना विचारले असता अयोध्येत श्रीरामाच्या चरणी कुणीही जाऊन दर्शन घेऊ शकतो इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाच्या गुन्ह्याविषयी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. हनुमान चालिसा म्हणणे हा राजद्रोह होऊ शकत नाही. सध्या राज्यात अनाचार सुरू असून मनमानी पद्धतीने दडपशाही सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आम्ही लढतच आहोत राज ठाकरे यांनी देखील लढले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा