शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

“निवडणूक लढणार नाही हे आता ठरवलेय, पण यापुढे...”; शरद पवारांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 15:23 IST

Sharad Pawar News: अयोध्येला रामदर्शनाला जाणार का? या प्रश्नावर शरद पवार यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

Sharad Pawar News: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. जागावाटपावरून इंडिया आघाडीचे एकमत होताना दिसत नाही. राज्यातही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसपूस असल्याची चर्चा आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली जात आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. आता निवडणूक लढणार नाही, हे मी आता ठरवले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. आमदार अपात्रता प्रकरण, बिलकिस बानो प्रकरण, आगामी लोकसभा निवडणुका, महाविकाससह इंडिया आघाडीची रणनीति अशा अनेकविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या वयाचा उल्लेख वारंवार केला जातो. त्यावरून टीकाही केली जाते. तुम्ही आता आशिर्वाद द्या. मार्गदर्शन करा. साथ द्या, अशी साद अजित पवार गटातील नेते शरद पवार यांना घालतात. याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

निवडणूक लढणार नाही हे आता ठरवले आहे

खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. त्यानंतर  निवडणूक लढणार नाही हे ठरवले आहे.  माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत काम करत राहणार आहे.   मला लोकांनी तिथे पाठवले आहे. तिथे काम करु नको का?  १९६७ पासून राजकारणात आहे . माझ्या विरोधकांनीही कधी वयावरून टीका केली नाही. अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे . तिथे मी काम करत राहणार आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचा भव्य सोहळा आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राम श्रद्धेचा विषय आहे. पक्षांकडून रामाबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.  जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य पक्षाचे‌ विधान नाही. मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही. हा सेक्युलर देश आहे . गर्दीत रामाच्या दर्शनाला जाणार नाही. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर जाईन, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस