पवईमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीत 18 लाख
By Admin | Updated: October 12, 2014 03:01 IST2014-10-12T03:01:30+5:302014-10-12T03:01:30+5:30
भांडुपमधून विधानसभेसाठी मैदानात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एल. बी. सिंग यांच्या मालकीच्या वाहनातून 18 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पवईमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गाडीत 18 लाख
>मुंबई : भांडुपमधून विधानसभेसाठी मैदानात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एल. बी. सिंग यांच्या मालकीच्या वाहनातून 18 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी सिंग यांच्या वाहनातून त्यांचे स्वीय सहाय्यक पारसनाथ यादव जात असताना गस्तीवर असलेल्या निवडणूक अधिका:यांच्या भरारी पथकाने त्यांना अडवले. वाहनांच्या झडतीत सिंग यांचे प्रसिद्धी पत्रक, मतदार कार्ड तसेच पक्षाच्या स्कार्फसह सीटखालून 18 लाखांची रोकड त्यांच्या हाती लागली. रोकड ताब्यात घेवून यादवसह त्यांचे वाहक कुंडेश्वर सहाणो यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.