राष्ट्रवादी म्हणजे राज्याचे रक्त शोषणारे गोचीड - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: October 16, 2015 09:58 IST2015-10-16T09:57:59+5:302015-10-16T09:58:44+5:30

शरद पवारांनी मुंबईत येऊन मुंगळा मुंगळा या गाण्यावर बारामती छाप कॅब्रे केला असून दुस-यांना मुंगळे म्हणण्यापूर्वी पवारांनी आत्मपरीक्षण करावे असे टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

NCP is the blood bank of the state - Uddhav Thackeray | राष्ट्रवादी म्हणजे राज्याचे रक्त शोषणारे गोचीड - उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी म्हणजे राज्याचे रक्त शोषणारे गोचीड - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ - शरद पवारांनी मुंबईत येऊन मुंगळा मुंगळा या गाण्यावर बारामती छाप कॅब्रे केला असून दुस-यांना मुंगळे म्हणण्यापूर्वी पवारांनी आत्मपरीक्षण करावे असे टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. सत्ता नसल्याने पवारांचा कोंडमारा चालला असून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राज्याचे रक्त शोषणारे गोचीड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे. 

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील युतीचे सरकार पडणार नाही. सत्तेच्या गुळाची चव जिभेवर आहे तोपर्यंत मुंगळे गुळाच्या ढेपेला चिकटून राहतात असे पवार यांनी म्हटले होते. पवार यांच्या विधानाचा शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.  सत्तेशिवाय पवारांचे सारे जीव व्यर्थ असून आता सत्ता नसल्याने त्यांचा कोंडमारा होत आहे. यावर उतारा शोधेपर्यंत राष्ट्रवादीने पवारांचे मन रमावे यासाठी 'मुंगळा मुंगळा' हे गीत पक्षाचे अधिकृत गीत म्हणून वाजवावे असे सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. विदेशी म्हणून ज्यांच्याविरोधात बोंबा मारल्या त्याच सोनिया गांधींबरोबर १० वर्ष सत्तेचा इटालियन पिझ्झा खाल्ला अशी बोचरी टीकाही त्यांनी पवारांवर केली आहे.  

 

Web Title: NCP is the blood bank of the state - Uddhav Thackeray