ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

By Admin | Updated: January 16, 2017 12:00 IST2017-01-16T12:00:03+5:302017-01-16T12:00:24+5:30

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय भोईर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

NCP big push in Thane | ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

 ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 16 - ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक जबरदस्त धक्का बसला आहे. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय भोईर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. केवळ संजय भोईरच नाही तर त्यांचे वडील देवराम भोईर, संजय यांच्या पत्नी उषा आणि त्यांचे भाऊ भूषणही आज मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक रवींद्र पाटीलदेखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 
 
भोईर कुटुंबीयांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.  देवराम भोईर यांना महापौर पदाची ऑफर देण्यात आल्यानं भोईर कुटुंब शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी बातम्या

 

Web Title: NCP big push in Thane