राष्ट्रवादीच्या संधीत कॉंग्रेसचा खोडा
By Admin | Updated: December 11, 2014 01:34 IST2014-12-11T01:34:40+5:302014-12-11T01:34:40+5:30
निवडणुकांअगोदर बिघाडी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत अजूनही पूर्णपणो दिलजमाई झाल्याचे चित्र नाही.

राष्ट्रवादीच्या संधीत कॉंग्रेसचा खोडा
योगेश पांडे ल्ल नागपूर
निवडणुकांअगोदर बिघाडी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत अजूनही पूर्णपणो दिलजमाई झाल्याचे चित्र नाही. शेतक:यांच्या प्रश्नावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी बाकांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांमधील अस्पष्ट दरी निदर्शनास आली. या दोन्ही पक्षांनी सत्ताधा:यांच्या विरोधात दोन दिवस एकजूट दाखवली असली तरी बुधवारी मात्र राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या बोलण्याच्या संधीदरम्यान काँग्रेसकडून वारंवार खोडा घालण्याचे प्रयत्न दिसून आले. दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ सुरू होती. सत्ताधा:यांनीदेखील यावर बोट ठेवून विरोधकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुंडे यांनी 26क् अंतर्गत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान जोरदार फटकेबाजी सुरू केली. शेतक:यांच्या समस्यांवर ते मुद्देसूदपणो बोट ठेवत असतानाच सत्ताधारी बाकांवर बसलेले सदस्यदेखील प्रभावित झाले होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते हे तर त्यांना सातत्याने प्रतिसाद देत होते. मुंडे यांच्या मुद्यांनी वेग घेतला असतानाच भाई जगताप यांनी मंत्रीच उपस्थित नसल्याचा आक्षेप घेत त्याला ‘ब्रेक’ लावला. उपसभापतींच्या मध्यस्थीनंतरदेखील काँग्रेसच्या सदस्यांकडून घोषणाबाजीला सुरुवात झाली.