शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Maharashtra Politics: “नवाब मलिक आणि अनिल देशमुख ही दोन्ही प्रकरणे BJPने जाणीवपूर्वक घडवून आणलेले कटकारस्थान”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 11:02 IST

येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि शिवसेना एकमेकांसमोर उभे ठाकले. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बुस्टर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मिळाल्यावरूनही अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  

कथित १०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ११ महिन्यांपासून आर्थररोड कारागृहात असलेले राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, देशमुख यांच्यावर  भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे देशमुख यांचा मुक्काम आर्थररोड कारागृहातच राहणार आहे. देशमुख यांचा जामीन मंजूर केला असला, तरी ईडीने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत, देशमुख यांच्या जामीन आदेशावर १३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. यानंतर अमोल मिटकरींनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

भाजपने जाणीवपूर्वक घडवून आणलेले कटकारस्थान होते

न्यायव्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणे भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेले कटकारस्थान होते. त्यामुळे आता केवळ एक जामीन मिळाला आहे, येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील, असा विश्वास अमोल मिटकरींनी व्यक्त केला. तसेच अनिल देशमुख यांना गेल्या ११ महिन्यांत शारीरिक व मानसिक त्रास झाला असेल. मात्र, उशीरा का होईना अनिल देशमुख यांना न्याय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ११ महिन्यांच्या तपासांत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आज त्यांना जामीन मिळाला आहे, लवकरच ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील, असे अमोल मिटकरी म्हणाले. 

दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन मिळाला असला, तरी भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत जामीन मिळूनही देशमुख यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीAnil Deshmukhअनिल देशमुखnawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस