शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Maharashtra Political Crisis: “दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत”; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादीचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:21 IST

Maharashtra Political Crisis: शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. विरोधी बाकांवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नव्या शिंदे-फडणवीस सरकावर अनेक मुद्द्यांवरून टीका केली जात आहे. यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा प्रश्न आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दौरा करत बळीराजाला झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. 

अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या आढावा बैठकीत अब्दुल सत्तार यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया जुलैमध्ये संपली आहे. तथापि, काही भागात जुलैपासून मुसळधार पाऊसही पडला आहे आणि याचा हिशेब घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारकडून बाधितांसाठी मदत योजना तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यानंतर अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांनी रात्रीच्या अंधारात बांधावर जाऊन नुकसान पाहणी केल्यावरून टोला लगावला आहे. 

अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य 

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा नांदेड भागात शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करायला कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे रात्री अंधारात गेले. अंधारात पिकाचे नुकसान पाहणारे हे दिव्य पुरुष खरंच धन्य आहेत, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला. तत्पूर्वी अब्दुल सत्तार यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या. याबाबत बोलताना, अशोक चव्हाण यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला गेलो होतो. अशोक चव्हाण यांना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्राविषयी चांगले ज्ञान आणि समज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचीही त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासोबतच मी कृषिमंत्री म्हणून माझे खाते सांभाळण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेईन, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, यापूर्वी अमोल मिटकरींनी केलेल्या एका ट्विटमध्ये, सत्ताधाऱ्यांना वारंवार सांगावे लागते आहे, हे सरकार गोर गरिबांसाठी काम करते आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे, याचं कारण "५० खोके एकदम ओके" हे  चांगलच झोंबलेलं दिसतंय, असा टोला लगावला. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळAmol Mitkariअमोल मिटकरीAbdul Sattarअब्दुल सत्तारNandedनांदेड