राष्ट्रवादीचीही आता सिने असोसिएशन
By Admin | Updated: July 1, 2015 01:21 IST2015-07-01T01:21:32+5:302015-07-01T01:21:32+5:30
शिवसेना आणि मनसेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आता सिने-नाट्य कलावंतांसाठीची असोसिएशन स्थापन करणार आहे.

राष्ट्रवादीचीही आता सिने असोसिएशन
मुंबई : शिवसेना आणि मनसेला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आता सिने-नाट्य कलावंतांसाठीची असोसिएशन स्थापन करणार आहे. त्यासाठी असोसिएशनची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नाव वापरून काही लोक विविध सेटवर जाऊन ब्लॅकमेल करीत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पक्षाने साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाची विद्यमान राज्य कार्यकारिणी बरखास्त करून टाकली.
या विभागाचे राज्यप्रमुख लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही माहिती दिली असून, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार कला, साहित्य, सांस्कृतिक विभागाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, असेही खाबिया यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा गैरवापर करून चित्रपटसृष्टीतील कलाकारांना वेठीस धरणाऱ्या लोकांविरुद्ध आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचेही खाबिया यांनी सांगितले. लवकरच पक्ष चित्रपट असोसिएशन तयार करेल असे सांगून खाबिया म्हणाले, की काही पक्ष सदस्यत्व देण्यासाठी मोठ्या रकमा फीपोटी घेतात. आमच्या पक्षातर्फे नाममात्र फक्त ५० रुपये फी ठेवण्याचा विचार आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा गैरवापर करुन चित्रपट सृष्टीतील कलाकारांना वेठीस धरणाऱ्या लोकांविरुध्द आपण पोलिसात तक्रार दाखल केल्याचेही खाबिया यांनी सांगितले.