शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटात येण्यास सुषमा अंधारेंची साद; रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “चांगली संधी...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:22 IST

NCP Ajit Pawar Group Rupali Patil Thombare News: स्त्री शक्तीला राजकारणामध्ये बळ मिळेल, असे सांगत सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात येण्याच्या दिलेल्या ऑफरवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

NCP Ajit Pawar Group Rupali Patil Thombare News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. महाविकास आघाडीच्या यशानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून ठाकरे गटात येण्याबाबत खुली ऑफर दिली आहे. यावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली. यानंतर अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. अशातच अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी साद घालत पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हटलेय?

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील ठोंबरे यांचा फोटो शेअर करत, निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लढाऊ कार्यकर्त्या… तरिही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…, अशी पोस्ट करत रुपाली पाटील ठोंबरे यांना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर दिली. 

सुषमा अंधारे यांच्या ऑफरवर रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली भूमिका स्पष्ट

राजकारणात सुषमा अंधारे माझ्या मैत्रीण आहेत. मात्र त्यांनी ऑफर दिली असली तरी मी अजित पवार यांच्यासोबत काम करणार आहे. सुषमा अंधारे यांनी अशा प्रकारची ऑफर देणे हे राजकारणातील महिलांसाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे. त्यामुळे स्त्री शक्तीला राजकारणामध्ये बळ मिळेल. सुषमा अंधारे यांनी त्यांना राष्ट्रवादीविषयी ज्या काही गोष्टी वाटल्या त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यांनी ऑफर दिल्याबद्दल आभारी आहे. येणाऱ्या काळात अजित पवारांसोबत काम करणार आहे. माझी मुस्कटदाबी होत असेल तर समोर येऊन नक्की सांगेन. पुढील काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारी मिळेल आणि चांगले काम करून दाखवू. सुषमा अंधारेची ऑफर सध्यातरी स्वीकारली नाही, असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना