‘नायगाव व्हावे स्त्रियांचे तीर्थक्षेत्र’
By Admin | Updated: January 4, 2016 03:20 IST2016-01-04T03:20:14+5:302016-01-04T03:20:14+5:30
‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. सावित्रीबार्इंचे जन्मगाव - नायगाव स्त्री सक्षमीकरणाचे तीर्थक्षेत्र व्हावे, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,’

‘नायगाव व्हावे स्त्रियांचे तीर्थक्षेत्र’
खंडाळा : ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. सावित्रीबार्इंचे जन्मगाव - नायगाव स्त्री सक्षमीकरणाचे तीर्थक्षेत्र व्हावे, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,’ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
नायगाव, ता. खंडाळा येथे सावित्रीबार्इंची १८५वी जयंती व भारतीय स्त्रीमुक्ती दिन समारंभामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते. विजय शिवतारे म्हणाले, ‘माझी मुलगी सावित्री व्हावी, ही प्रत्येक पालकाची आस असली पाहिजे. नायगावच्या विकास आराखड्यातील प्रलंबित कामे मार्गी लावून निधी उपलब्ध केला जाईल. नायगावला पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा करू. गावातील प्राथमिक शाळेची सुसज्ज इमारत बनविण्याची कार्यवाही १५ दिवसांत पूर्ण करून घेतली जाईल.
या वेळी सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.