नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या
By Admin | Updated: April 25, 2016 11:32 IST2016-04-25T11:32:42+5:302016-04-25T11:32:42+5:30
पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रविवारी रात्री दोन जणांची हत्या केली.

नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २५ - पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल रविवारी रात्री दोन जणांची हत्या केली. मतकूरशहा होळी रहाणारा खामतळा व गांगसू कुमोटी राहणारा हुरियालदंड कुरखेडा अशी मृतांची नावे आहेत.
दोन दिवसांपूर्वी सशस्त्र नक्षल्यांनी मतकूरशहा होळी व गांगसू कुमोटी यांचे गावातून अपहरण केले. त्यानंतर बेदम मारहाण करुन त्यांची हत्या केली.
आज सकाळी हत्या झाल्याची माहिती कळताच परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर विस्तृत माहिती मिळेल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.फस्के यांनी सांगितले.