नक्षलवादी भेलके दांपत्याला १३ नोव्हेबरपर्यंत एमसीआर
By Admin | Updated: October 31, 2014 00:46 IST2014-10-31T00:46:22+5:302014-10-31T00:46:22+5:30
नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला अरूण भेलके आणि त्याची पत्नी कांचन भेलके (नन्नावरे) यांना गुरूवारी न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत

नक्षलवादी भेलके दांपत्याला १३ नोव्हेबरपर्यंत एमसीआर
पुण्यात अटक : पुणे पोलिसांकडून चंद्रपूर पोलिसांनी घेतले ताब्यात
चंद्रपूर : नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला अरूण भेलके आणि त्याची पत्नी कांचन भेलके (नन्नावरे) यांना गुरूवारी न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भेलके दांपत्याला २८ तारखेला चंद्रपूर पोलिसांनी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाने २ सप्टेंबरला त्यांना नक्षलवादी चळवळीमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून अटक केली होती.
यापूर्वीही त्यांना चंद्रपूर पोलिसांनी कार्बाइन व १३० राऊंडसह अटक केली होती. मात्र जामीनावर सुटल्यावर हे दांपत्य फरार झाले होते. त्यांनी पुण्यातील कान्हेफाटा येथे आश्रय घेतल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती.
चंद्रपूर पोलिसांनी मंगळवारी त्यांना ताब्यात घेतल्यापासून गेले दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली. गुरूवारी जिल्हा सत्र न्यायालयात अत्यंत कडेकोट बंदोबस्तात त्यांना हजर करण्यात आले.
न्यायालयाच्या सुनावणीनंतर चोख चंदोबस्तात त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)