गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान शहीद

By Admin | Updated: June 28, 2014 01:50 IST2014-06-28T01:50:58+5:302014-06-28T01:50:58+5:30

नक्षलविरोधी शोधमोहीम राबविताना पोलीस व नक्षलवाद्यांत उडालेल्या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला.

Naxal attack in Gadchiroli | गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान शहीद

गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात जवान शहीद

>गडचिरोली : नक्षलविरोधी शोधमोहीम राबविताना पोलीस व नक्षलवाद्यांत उडालेल्या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे हा जवान शहीद झाला. तर या घटनेत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा गडचिरोली पोलिसांनी केला आहे. ही घटना कोरची तालुक्यातील कटेझरी-देवसूर मार्गावर जंगल परिसरात घडली़ ठार झालेल्या नक्षलींचे मृतदेह त्यांच्या साथीदारांनी जंगलात ओढून नेल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे. 
धानोरा तालुका मुख्यालयापासून 4क् किमी अंतरावर छत्तीसगड सीमेला लागून गॅरापत्ती पोलीस मदत केंद्र आहे. या केंद्रातील सी-6क् पथकाचे जवान 15 दिवसांपासून कटेझरी - देवसूर जंगल परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबवित होते. गुरुवारी रात्री नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत उमेश पांडुरंग जावळे (28) हा पोलीस जवान शहीद झाला. घटनेनंतर परिसराची कसून तपासणी करण्यात आली. यात एक भरमार, एक वॉकीटॉकी व दोन पिट्ट असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. 
शुक्रवारी सकाळी शहीद जवानाचे पार्थिव हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. गडचिरोलीत पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर दुपारी 1 वाजता शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्याचे पार्थिव विशेष हेलिकॉप्टरने उस्मानाबाद जिल्ह्यातील त्याच्या गावी पाठविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
 
नक्षलवाद्यांशी चर्चा करणार नाही. त्यांच्याकडून झालेल्या हल्ल्यास जशास जसे प्रत्युत्तर दिले जाईल, त्यासाठी राज्यांमध्ये कमांडो दलाची स्थापना करण्यात येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. 

Web Title: Naxal attack in Gadchiroli