बलात्कारी नांबियारला 7 दिवसांची कोठडी

By Admin | Updated: September 7, 2014 01:42 IST2014-09-07T01:42:28+5:302014-09-07T01:42:28+5:30

बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला मीरा-भाईंदर शहर शिवसेना उपजिल्हाप्रमुख वासुदेव नांबियारला न्यायालयाने 11 सप्टेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली.

Nawiaral gets 7 days custody | बलात्कारी नांबियारला 7 दिवसांची कोठडी

बलात्कारी नांबियारला 7 दिवसांची कोठडी

भाईंदर : बलात्काराच्या आरोपावरून अटकेत असलेला मीरा-भाईंदर शहर शिवसेना उपजिल्हाप्रमुख  वासुदेव नांबियारला न्यायालयाने 11 सप्टेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली. 
शिवसेनेत जोशात असताना त्याने परिसरात नित्यानंद ज्ञान प्रबोधिनी विद्यामंदिर नामक शैक्षणिक संस्था निर्माण करुन खाजगी शाळा सुरु केली आहे. तसेच पुरातन विष्णु भगवान मंदिराचा जिर्णोद्धार करुन पुढे महाविष्णुचे प्रशस्त मंदिर बांधले. 
या वास्तूचा संस्थापक असलेल्या नांबियारने अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे त्याच्या जवळच्या व्यक्तींकडून सांगण्यात येत आहे. युतीच्या राज्यात अशाच एका प्रकरणात अंधेरी पोलिसांनी नांबियारला अटक केली होती. परंतु, त्यावेळच्या युतीतील एका मंत्र्याने नांबियारला मदतीचा हात देऊन प्रकरण मिटवले होते.  त्यामुळे यासर्व प्रकरणांची सखोल चौकशी  करून त्याच्यावर कठोर कारवाईची 
मागणी महिला संघटनांकडून होत आह़े  (प्रतिनिधी)

 

Web Title: Nawiaral gets 7 days custody