नवरदेव, नातेवाइकांवरही होणार गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 20, 2014 02:59 IST2014-12-20T02:59:08+5:302014-12-20T02:59:08+5:30
शिक्षण सोडून मनाच्या विरोधात लग्न लावून देण्यात येत असल्यामुळे मुलीने मंडपातच आत्महत्येचा प्रयत्न केला.

नवरदेव, नातेवाइकांवरही होणार गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर
शिक्षण सोडून मनाच्या विरोधात लग्न लावून देण्यात येत असल्यामुळे मुलीने मंडपातच आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही नववधू अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाल्याने नवऱ्याासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शहाड, गरीबनगरमध्ये राहणारे दामोदर आणि दिनकर शिरसाठ या दोघा भावांचा विवाह, घाटकोपर येथील दोन सख्ख्या बहिणींसोबत होणार होता. मात्र, नवरीने स्वच्छतागृहात जाऊन फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आता तिची प्रकृती स्थिर आहे.
उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी अलका पाटिल यांनी दिली. नवरदेवासह त्यांची आई तसेच मुलीच्या वडिलांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मोठी १७ तर धाकटी वधू १५ वर्षांची आहे.