शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शोलेस्टाईल शुभेच्छा, सोशल मीडियावर त्या ट्विटची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 12:55 IST

Sanjay Raut Birthday: Shiv Sena नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात Sanjay Raut यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले Nawab Malik यांनीही संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्र आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात संजय राऊत यांच्याप्रमाणेच चर्चेचा विषय ठरलेले नवाब मलिक यांनीही संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र नवाब मलिक यांनी संजय राऊत यांना दिलेल्या शुभेच्छा ह्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

नवाब मलिक यांनी ट्विट करून संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी शोले चित्रपटातील अजरामर  ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’, या गाण्याचा उल्लेख करत मलिक यांनी संजय मलिक यांच्याशी असलेले आपले मैत्रिपूर्ण संबंध अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर, तेरा साथ ना छोडेंगे’, हॅप्पी बर्थ डे संजय राऊतजी, अशा शब्दात शुभेच्छा देत मलिक यांनी राऊत यांच्यासोबतची मैत्री कायम राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

गेल्या महिन्यामध्ये मुंबईत आलिशान क्रूझवर एनसीबीकडून झालेली कारवाई आणि त्यात आर्यन खानला झालेल्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी एसीबी आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता. तेव्हापासून मलिक यांनी एक एक करत देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपाच्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवली होती. त्यानंतर भाजपाकडूनही मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, नवाब मलिक भाजपाविरोधात आक्रमक झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले होते. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदांमुळे भाजपाला सॉलिड उत्तर मिळालंय, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी संजय राऊत यांच्याबाबत शोलेस्टाईल शुभेच्छा दिल्याने आता या दोघांची मैत्री कुठल्या वळणावर जाईल याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण