शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Nawab Malik on NCB: 'समीर वानखेडेंसाठी भाजप नेत्यांचं दिल्लीत लॉबिंग'; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 12:44 IST

'याबाबत चौकशीसाठी मी स्वत:पत्र लिहिणार, न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाणार.ट

मुंबई: क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणापासून सुरू झालेलं नवाब मलिक (Nawab Malik)  विरुद्ध मुंबई एनसीबी (NCB) युद्ध अजून संपलेलं नाही. नवाब मलिक सातत्याने एनसीबी आणि समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) टीका करत आहेत. आजही मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एनसीबीवर टीका केली. तसेच, समीर वानखेंडेंना पदावर कायम ठेवण्यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप केला.

'वसुली गँगमध्ये भाजपचा सहभाग?'नवाब मलिक म्हणाले की, एका आठवड्यापासून बातम्या पेरण्यात येत आहेत की, समीर वानखेडे एक्सटेन्शन घेणार नाहीत. पण मला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत. सर्व बेकायदेशीर कामे या अधिकाऱ्यांनी केल्याचे रिपोर्ट असतानाही भाजपचे नेते समीर वानखेडेंना मुंबईत ठेवण्यात उत्सुक आहेत. म्हणजे वसुली गँगमध्ये त्यांचा सहभाग आहे का? असा खोचक सवाल मलिकांनी यावेळी केला.

'न्यायालयात हा विषय घेऊन जाणार'31 तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केलं गेलं नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केलं गेलं? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत. असू द्या...वानखेडेंना इथे ठेवले, तर चांगलंच होईल. त्यांचा फर्जीवाडा बाहेर काढण्याची आम्हाला संधी मिळेल. पण ज्या पद्धतीने इतकं होऊनही हे अधिकारी पंचनामा बदलण्यात व्यस्त आहेत, निश्चित रुपाने याबाबत चौकशीसाठी मी स्वत:पत्र लिहिणार आहे. न्यायालयासमोर हा विषय घेऊन जाईल. यांच्या विरोधात आणखी काही पुरावे आहेत त्याबाबत टप्प्याटप्प्याने भविष्यात सांगेन. 

'एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार'मलिक पुढे म्हणाले, एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरुच आहे. 2021 मध्ये NCB ने खोटे आरोप दाखल केले जात होते, मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जात होते. क्रुझवरील रेडनंतर अनेक प्रकरणं पुढे आली. एनसीबीमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. मागील तारखांच्या पंचनाम्यावर सही केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. मॅडी नावाचा एनसीबीचा एक पंच आहे त्याला बाबू नावाचा एक अधिकारी पंचनामा बॅक डेटडवर सही करण्यासाठी सांगत आहे. त्यानंतर घाबरलेला पंच समीर वानखेडेंना फोन करुन विचारतो तेव्हा समीर वानखेडे सांगतात की, सही करा काही होणार नाही.

मलिकांकडून ऑडिओ क्लिप जारी2 ऑक्टोबर 2021 क्रुझ रेड प्रकरणात एनसीबीचा फर्जीवाडा अजूनही सुरू आहे. एनसीबीचे अधिकारी अडचणीत येणार हे लक्षात येताच पंचनामे बदलण्याचे काम सुरू आहे. यावेळी, कथित संभाषणाची क्लिप ऐकवत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. एसआयटी समीर वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला आहे. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोBJPभाजपा