शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Nawab Malik Arrested : आधी लढलो आताही लढणार..., आणखी फर्जीवाढे उघडे करू; नवाब मलिकांच्या मुलीची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 06:02 IST

Nawab Malik Arrested : मलिक यांना न्यायालयात आणताच तेथे त्यांचे कुटुंबीयही हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते. 

Nawab Malik Arrested : नवाब मालिकांच्या अटकेच्या वृत्तानंतर ईडी कार्यालयाबाहेर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी  आक्रमक होत भाजपविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जमण्यास सुरुवात केली. मुंबई पोलिसांकडूनही मलिक यांच्या घरासह ईडी कार्यालय, जेजे रुग्णालय आणि कोर्टाबाहेर बंदोबस्त वाढवला होता. अटकेबाबत समजताच कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवून पुन्हा माघारी धाडले. ‘मी साहेबांसोबत’ असे लिहिलेल्या टोप्या परिधान करत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती.       

दुसरीकडे मालिकांच्या अटकेचे वृत्त समजताच तणावात भर पडली. नवाब मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर आणताच, हसतच हम लढेंगे म्हणत वाहनातून बाहेर पडले. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी वाढली. पोलीस उपायुक्त डॉ. हरी बालाजी यांनी स्वतः हजर राहून परिस्थिती नियंत्रणात आणत, कार्यकर्त्यांना समजावून माघारी पाठवण्याचा प्रयत्न केला.  मलिक यांना न्यायालयात आणताच तेथे त्यांचे कुटुंबीयही हजर होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते. सुनावणीनंतर पावणेनऊच्या सुमारास मलिक यांना कोर्टातून ईडी कार्यालयात नेण्यात आले. 

आधी लढलो आताही लढणार.. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी सांगितले की, वडिलांना भेटून पुन्हा लढण्याची हिम्मत आली आहे. आम्ही आधीही लढलो आणि पुढेही लढणार आहोत. तसेच, त्यांनी आधीही सांगितले होते ते आणखीन फर्जीवाडे उघड करणार आहेत. आरोप केल्यामुळे सत्य लपून राहत नाही. आता सुरू झालेली लढाई ही राजकीय आहे. आरोप करणारे लोक पुरावे देत नाहीत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यानुसार, आम्ही आधीही  लढलो आणि पुढेही लढणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्र