नौदलाने मुंबईजवळ बुडत्या जहाजातून २० जणांना वाचवले
By Admin | Updated: June 22, 2015 11:52 IST2015-06-22T10:55:42+5:302015-06-22T11:52:43+5:30
नौदलाच्या अधिका-यांनी मुंबईतील समुद्रात बुडणा-या जहाजातून २० जणांची सुखरूप सुटका केली आहे. 'जिंदल कामाक्षी' असे या खासगी जहाजाचे नाव असून जहाजात अडकलेल्या २० प्रवाशांना वाचवण्यात जवानांना यश मिळाले.

नौदलाने मुंबईजवळ बुडत्या जहाजातून २० जणांना वाचवले
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - नौदलाच्या अधिका-यांनी मुंबईतील समुद्रात बुडणा-या जहाजातून २० जणांची सुखरूप सुटका केली आहे. 'जिंदल कामाक्षी' असे या खासगी जहाजाचे नाव असून जहाजात अडकलेल्या २० प्रवाशांना वाचवण्यात जवानांना यश मिळाले आहे. कोचीनहून मुंद्रा बंदराच्या दिशेने हे जहाज निघाले होते.
मुंबईपासून ४० नॉटिकल दूर समुद्रात असलेल्या या जहाजात पाणी शिरलं होतं. खराब हवामानामुळे जहाजाचा कंट्रोल रूमशी संपर्कही तुटत चालला होता. या बुडणा-या जहाजाता २० प्रवासी होते. आप्तकालीन स्थितीत जहाजावरून नौसेनेकडे मदत मागण्यात आली व त्यानंतर लगेच नौदलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने २० जणांचे प्राण वाचवले.