शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Navratri Special 2021: माहूर गडावर... जय देवी जय देवी, जय रेणुका मातेचा गजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 08:19 IST

नवरात्रात दरवर्षी माहूर गडावर शारदीय महोत्सव साजरा होतो. परंतु गतवर्षी कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच महोत्सव पार पडला नाही

तिसरी माळमहाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी रेणुकादेवी माहूर हे एक पूर्ण पीठ आहे. प्रतिवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. गतवर्षी कोरोनामुळे नवरात्र यात्रा रद्द करण्यात आली होती.

यादवकालीन राजाने बांधले मंदिरएक महान धार्मिक स्थळ व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर शहरापासून सुमारे २.४१५ किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या यादवाचा राजा यांनी देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधले होते. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रेणुकादेवीच्या सन्मानार्थ येथे मोठी यात्रा भरते.  श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा  आहे.

रेणुका मातेचा शारदीय महोत्सवनवरात्रात दरवर्षी माहूर गडावर शारदीय महोत्सव साजरा होतो. परंतु गतवर्षी कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच महोत्सव पार पडला नाही. परंतु यंदा शासनाने नियमात बदल करुन लसीकरण बंधनकारक करीत १६ हजार भाविकांना दररोज दर्शनाची सोय केली. यात ऑनलाईन १२ हजार व ऑफलाईन ४ हजार भाविकांचा समावेश आहे. दीड वर्षानंतर मंदिर प्रशासनाने सुरू होत असल्याने प्रशासनाने चांगलीच तयारी केली होती. नवरात्रोत्सव काळात सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत मंदिर दर्शनासाठी सुरू ठेवण्यात येणार असून वेळेत बदल करण्याचा अधिकार विश्वस्त मंडळाने राखून ठेवला आहे, असे सांगण्यात आले.

कोरोना काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेत प्रशासन कामाला लागले आहे. सर्वच विभागाचे प्रमुख व कर्मचारी भाविकांना सुलभ दर्शन मिळावे व कोविड नियमांचे पालन व्हावे म्हणून प्रयत्नशील आहेत. - राकेश गिड्डे, कोषाध्यक्ष, विश्वस्त समिती तथा तहसीलदार, माहूर

टॅग्स :Navratriनवरात्री