शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ, शक्तीपीठे गजबजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 05:11 IST

वणीची सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात ठिकठिकाणी पारंपरिक उत्साहात आणि भक्तीभावाने आईचा जयघोष करत घटस्थापना करुन राज्यात रविवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.

कोल्हापूर/नाशिक/नांदेड/उस्मानाबाद : वणीची सप्तशृंगी देवी, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची आई तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांसह राज्यात ठिकठिकाणी पारंपरिक उत्साहात आणि भक्तीभावाने आईचा जयघोष करत घटस्थापना करुन राज्यात रविवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.करवीरनिवासिनी कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता. रविवारी अंबाबाईची त्रिपुरासुंदरी रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. पहाटे काकडआरती, पहिला अभिषेक झाल्यानंतर मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. तोफेच्या सलामीने नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. दुपारी साडेबाराची आरती झाल्यानंतर अंबाबाईची त्रिपुरसुंदरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.साडेतीन शक्तिपिठांपैकी एक सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास मंगलमय वातावरणात हजारो भक्तांच्या साक्षीने सुरुवात झाली. उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत सप्तशृंगी देवी मंदिरात रविवारी पहिल्या माळेची महापूजा जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र मंडाले यांनी सपत्नीक केली.श्रीक्षेत्र माहूरगडावर श्री रेणुकामाता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विधीवत महापूजेनंतर वेदघोषात घटस्थापना करण्यात आली़ यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक धोळकिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती़सकाळी महापूजेनंतर पिवळे महावस्त्र अर्पण करून अलंकार चढविण्यात आले़ यामध्ये पोहेहार, बोरमाळ, पुतळ्याची माळ, कर्णफुले, मत्स्यनथ, नवरत्नाच्या अलंकाराची बिंदी, सुवर्ण पिंपळपान यासह इतर अलंकार अर्पण करण्यात आले़ घटस्थापना झाल्यानंतर पिवळे महावस्त्र अलंकाररूपी मातेचे शैलपुत्रीरुपी दर्शन भाविक भक्तांनी घेतले़ नवरात्रोत्सवानिमित्त जगन्नाथपुरी येथून आलेले ८ वैदिक पंडित ९ दिवस चतुर्वेदाचे पारायण करणार आहेत.तुळजापुरात जयघोष‘आई राजा उदो..उदो, सदानंदीचा उदो..उदो’च्या जयघोषात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने सिंह गाभाºयात २९ सप्टेंबर रोजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व त्यांंचे पती विश्वास मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. संभळ व बँडच्या वाद्यात अध्यक्षा मुंडे, भोपे पुजारी, पाळेकर पुजारी, सेवेकरी यांच्यासमवेत गोमुख तीर्थ याठिकाणी ठेवण्यात आलेल्या तिन्ही घटजल कलशाची विधीवत पूजन करून दर्शन घेतले. 

टॅग्स :Navratriनवरात्रीMaharashtraमहाराष्ट्र