शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Navneet Rana Devendra Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता खा. नवनीत राणांवर कारवाईचे आदेश देतील का?; राष्ट्रवादीचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:56 IST

भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा डाव असल्याचाही राष्ट्रवादीचा आरोप

Navneet Rana Devendra Fadnavis: मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच या मुद्द्यांच्या मार्फत  शिवाय जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. एका युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी काल अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती, मात्र त्या युवतीने स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले. त्यामुळे अशा प्रकरणात कुणाला रस होता हे समोर आले असून या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणार्‍या नवनीत राणांसारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची भूमिका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार का? असा रोखठोक सवालही राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन खासदार नवनीत राणा पोहोचल्या होत्या. त्यांनी हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा आरोप करत पोलीस ठाण्यातच पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला होता. खासदार नवनीत राणा यांचा रूद्रावतार पाहून पोलिस कर्मचारीही सुरूवातीला गोंधळून गेले. पण अखेर ती युवती स्वत:च्या मर्जीने घरातून निघून गेल्याचे स्पष्ट झाल्याने नवनीत राणा तोंडघशी पडल्या. त्यानंतर पोलीसांच्या संघटनेने नवनीत राणांचा जाहीर निषेध केला. नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा. तसेच वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे त्यांनी टाळावं व त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी अशी मागणीही महाराष्ट्र पोलीस भरती संघटनेच्या वतीने करण्यात आली. या वादात राष्ट्रवादीने उडी घेत, अशा प्रकारे धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर गृहमंत्री फडणवीस कारवाई करणार का? असा सवाल तपासे यांनी उपस्थित केला.

भाजपा आमदार राम कदमांवरही टीका

"बुधवारी याकुब मेमनच्या कबरीचा विषय भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातही तो जुना फोटो असल्याचे समोर आले. या घटनेमधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? याचाही तपास करण्यात यावा. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला होता तर दुसरीकडे पालघरमध्ये साधूंच्या हत्येप्रकरणीही पोलिसांकडे बोट दाखवण्यात आले होते. मध्यंतरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दांपत्याने करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यातच आता तर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा आहे. पण याकुब मेमन आणि कथित लव्ह जिहादचा विषय आणून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीय तेढ निर्माण करणार्‍या अशा नेत्यांवर कारवाई करण्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसदी घेतील का?" असा सवाल महेश तपासे यांनी केला आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmravatiअमरावतीRam Kadamराम कदम