शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

नवनीत कौर-राणाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 15:25 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीकडून आधीच एक जागा सोडण्यात आली आहे.

मुंबई : भाजप आणि शिवसेना युती झाली असली तरीही रिपब्लिकन आणि अन्य मित्रपक्षांना एकही जागा सोडत नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्याल्या आलेल्य़ा जागांपैकी प्रत्येकी 2 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासाठी एक जागा सोडण्यात येणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून राणा यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नवनीत कौर राणा या लढण्याची शक्यता आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीकडून आधीच एक जागा सोडण्यात आली आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सांगलीची जागाही स्वाभिमानीला सोडण्याचा विचार झाला असून ही जागा काँग्रेसच्या कोट्यातून देण्यात येणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद आणि अहमदनगर या दोन जागांची अदलाबदली करण्यास आपण तयार आहोत असेही काँग्रेसने कळवले होते. मात्र तो निर्णय अंमलात आला नाही. तेव्हा राष्ट्रवादीने अमरावती व औरंगाबादची अदलाबदल करुन मागितली. मात्र त्यावर मंगळवारी रात्रीपर्यंत काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आले नव्हते. त्याच काळात नवनीत कौर राणा शरद पवारांना भेटल्या. तेव्हा आम्ही तुम्हाला पाठींबा देऊ, मात्र दोन दिवस वाट पहावी लागेल, काँग्रेसचा निरोप काय येतो ते पाहू, असे त्यांना आज सांगण्यात आले आहे. मात्र, राणा पतीपत्नी आणि शरद पवार यांच्या बैठकीचा सूर ओळखून नवनीत राणा यांनी आपल्याला पवारांनी पाठींबा देऊ केला, असे जाहीर करुन टाकले होते. यामुळे नवनीत कौर यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागा देण्यात येणार असल्याचे समजते. तर चौथी जागा बहुजन विकास आघाडीला देणात येणार आहे. 

 

नवनीत कोर राणा शरद पवार भेटीत काय घडले नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी खा. शरद पवार आणि खा. प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. नवनीत कौरसाठी उमेदवारी दिल्यास आम्ही विजय मिळवून देऊ असे त्या दोघांनीही पटवून दिले. मात्र अमरावतीची जागा कोणी लढवायची यावर अद्याप दोन्ही काँग्रेसमध्ये एकवाक्यता न झाल्यामुळे याचा निर्णय झाल्यावरच भूमिका स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके उपस्थित होते. मात्र त्यांची आणि राणा पतीपत्नींची भेट झाली नाही. यावर खोडके यांना विचारले असता ते म्हणाले, मी माझी भावना शरद पवार यांना भेटून स्पष्ट केली आहे. त्यावर मी माध्यमांमध्ये काही बोलणार नाही.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसRaju Shettyराजू शेट्टीSharad Pawarशरद पवार