नवी मुंबईत भररस्त्यात चौघांवर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:20 IST2017-09-06T14:29:01+5:302017-09-06T15:20:14+5:30

सोसायटीमधील वादातून जमावाने चौघांवर कोयत्याने हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला.

In Navi Mumbai, one killed, three injured and four injured in accidents | नवी मुंबईत भररस्त्यात चौघांवर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

नवी मुंबईत भररस्त्यात चौघांवर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

नवी मुंबई, दि. 6 - नवी मुंबईत सोसायटीमध्ये झालेल्या वादातून चौघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ऐरोली सेक्टर 2 मधील रोझ वुड सोसायटीत भरदिवसा ही घटना घडली. या सोसायटीमध्ये सकाळी मिटिंग झाली. त्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता आहे. 

संतप्त जमावाने चौधरी मेडीकलमध्ये घुसून हा हल्ला केला. आरोपींपैकी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. वामन भोईर असे आरोपीचे नाव आहे. वामन हल्ला करताना स्वत: सुद्धा जखमी झाला. त्यालाही रुग्णालयात नेण्यात आले आहे.  

रवी चौधरी असे मृताचे नाव आहे. सोहम, अर्जून, मोहन हे  गंभीर जखमी असून, तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. रबाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणी तपास सुरु आहे. 

Web Title: In Navi Mumbai, one killed, three injured and four injured in accidents