...ते अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे
By Admin | Updated: June 18, 2014 04:41 IST2014-06-18T04:41:12+5:302014-06-18T04:41:42+5:30
लापूर औद्योगिक संघटनेमार्फत चालविण्यात येणारे अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्या
...ते अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे
मुंबई : बेलापूर औद्योगिक संघटनेमार्फत चालविण्यात येणारे अग्निशमन केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण कराव्या, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी दिले.
नाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे यासंदर्भात बैठक झाली. माजी खासदार संजीव नाईक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे, नवी मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच ठाणे बेलापूर औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणे, नवी मुंबई पट्टयात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने होते. या बाबीचा विचार करून ठाणे, बेलापूर औद्योगिक संघटनेमार्फत अग्निशमन केंद्र सुरू करण्यात आले होते. ते केंद्र अधिक सक्षमपणे कार्यरत रहावे, यासाठी हे केंद्र नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतर करणे आवश्यक आहे. मात्र हस्तांतर करताना कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा आणि इतर प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असे नाईक म्हणाले.
इंधनावरील अधिभार काढावा
महापालिका हद्दीत व्हॅट अधिभार लावल्यामुळे पेट्रोल, डिझेल महाग होत आहे. त्यामुळे हा अधिभार रद्द करावा, अशा सूचना गणेश नाईक यांनी अन्य एका बैठकीत दिले.
या बैठकीस माजी खासदार संजीव नाईक, विक्रीकर आयुक्त नितीन करीर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पेट्रोल डिझेल वितरक संघटनेचे शिष्टमंडळ उपस्थित होते. नवी मुंबईत बांधण्यात आलेल्या उड्डाणपूलाचा वापर प्रामुख्याने मुंबई, पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांमार्फत होतो. या ठिकाणी पेट्रोल डिझेलवर अधिभार लावल्यामुळे स्थानिक नागरिकांना पेट्रोल, डिझेल ४ रुपयांनी महाग मिळत आहे. (विशेष प्रतिनिधी)