शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

नवी मुंबई-‘गेट वे’ प्रकल्प दोन वर्षांत

By admin | Updated: July 27, 2016 02:31 IST

वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प

मुंबई : वाहतूक आणि पर्यावरणावरील ताण कमी करण्याकरीता जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची राज्य सरकारची योजना असून नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया हा जलवाहतूक प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली.संदीप नाईक, पांडुरंग बरोरा, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की नवी मुंबई ते गेट वे आॅफ इंडिया जलवाहतुकीचा मार्ग तयार करण्यासाठी साधारणपणे १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. असे असले तरी या मार्गावरील सर्व सुरक्षा तपासून साधारणपणे मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात या मार्गावरील जलवाहतूक सुरू होईल. नवीन भाऊचा धक्का (मुंबई) ते नेरु ळ, नवी मुंबई अशी जलवाहतूक व्यवस्था तयार करण्यात येत आहे. पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक सुरू करण्यासाठी नवीन भाऊचा धक्का येथे मुंबई बंदर विश्वस्त मंडळ, केंद्र शासन, तसेच नेरु ळ- नवी मुंबई येथे सिडको आणि अलिबागच्या मांडवा येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामाफत जलप्रवासी टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे. मांडवा येथे करावयाच्या जलप्रवासी प्रकल्प टर्मिनलच्या कामाची निविदा निश्चित करण्यात आली असून याचे काम लवकरच सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी, बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, जलवाहतुकीच्या अंतर्गत भाऊचा धक्का येथील ११० कोटीचे काम पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून होणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धक्क्यावर लाट अडविण्यासाठी १३५ कोटींचे काम असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. बांद्रा ते दहिसर मार्गावर जलवाहतूक सुरु करण्याच्या सूचनेचा विचार केला जाईल. त्यासाठी सल्लागार नेमून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर मग त्याबाबत निर्णय घेतला जाईल. (विशेष प्रतिनिधी)नवी मुंंबई विमानतळाच्या अडचणी व अडथळे असून कधी दूर करणार अशी विचारणा पतंगराव कदम यांनी केली, तेव्हा या विमानतळासाठी शासकीय अडथळे नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.