नवी मुंबई: अस्वच्छतेमुळे बिकानेर स्वीट्समधील पदार्थ विक्रीवर बंदी
By Admin | Updated: July 18, 2016 16:41 IST2016-07-18T15:58:44+5:302016-07-18T16:41:40+5:30
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असल्याने तेथील पदार्थ्यांच्या विक्रीवर एफडीएने बंदी आणली.

नवी मुंबई: अस्वच्छतेमुळे बिकानेर स्वीट्समधील पदार्थ विक्रीवर बंदी
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. १८ - समोरून चांगल्या दिसणाऱ्या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात. सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.