नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांचा बिगुल
By Admin | Updated: March 24, 2015 02:32 IST2015-03-24T02:32:15+5:302015-03-24T02:32:15+5:30
नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़
नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकांचा बिगुल
२२ एप्रिलला मतदान : २३ रोजी मतमोजणी
मुंबई : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या दोन्ही महापालिकांसाठी २२ एप्रिलला मतदान होणार आहे़ या दोन्ही महापालिका हद्दीत सोमवारी रात्रीपासून आचारसंहिता लागू झाली आहे़
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे़ एस़ सहारिया यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नवी मुंबई महापालिकेच्या १११, तर औरंगाबाद महापालिकेच्या ११३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे़ या निवडणुकांस ३१ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील़ ८ एप्रिलला अर्जांची छाननी तर लगेचच वैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल़ १० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील तर ११ एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल़ २२ एप्रिलला सकाळी ७़३० ते सायं. ५़३० या काळात मतदान होईल. २३ एप्रिलला सकाळी १०पासून मतमोजणी सुरु होईल़