शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! इनोव्हावर पोलिस लिहिलेले, सकाळी सकाळी दारुच्या नशेत अनेक वाहनांना उडविले; आतमध्ये... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 13:09 IST

Navi Mumbai News: नवी मुंबईतील करावे गावाजवळ मद्यधुंद इनोव्हा चालकाने अनेक वाहनांना धडक दिली. कारमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांचे ओळखपत्र सापडल्याने खळबळ. वाचा सविस्तर.

नवी मुंबई: नवी मुंबईतील करावे गावाजवळ एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव वेगात अनेक वाहनांना धडक देऊन भीषण अपघात घडवला. विशेष म्हणजे, ज्या कारने हा अपघात केला त्यावर ‘पोलिस’ अशी नेमप्लेट असल्याने आणि कारमध्ये मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे ओळखपत्र सापडल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करावे गावाजवळ एक इनोव्हा कार सुसाट वेगाने येत होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आणि रस्त्यावरून धावत असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कारमध्ये सापडले वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे आयडी कार्ड अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी कारची पाहणी केली असता, कारवर 'पोलिस' अशी पाटी होती. तसेच कारच्या आत मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचे ओळखपत्र सापडले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार, कार चालक प्रचंड नशेत होता आणि त्याच अवस्थेत तो गाडी चालवत होता.

तपास सुरूघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही कार नेमकी कोणाची आहे आणि अपघाताच्या वेळी चालक कोण होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे ओळखपत्र सापडल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, दोषींवर काय कारवाई होते की प्रकरण दाबले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk driver in 'Police' car crashes into vehicles in Navi Mumbai.

Web Summary : A drunk driver in a car marked 'Police' caused a major accident near Navi Mumbai, colliding with multiple vehicles. An ID of a senior Mumbai police inspector was found inside. Police are investigating the incident.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMumbai policeमुंबई पोलीस