शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 03:18 IST

न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : भरती प्रक्रियेतील तरुणांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा उमेदवारांचे आझाद मैदानात २७ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी आंदोलक अतिष पाटील यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करून दुपारी सोडण्यात आले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व आमदार नितेश राणे यांनी आंदोलक मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली. महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२ मधील कलम १८ अन्वये काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी मराठा उमेदवारांचे २७ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. रविवारी सकाळी आंदोलक अतिष पाटील हे दोन वेळा चक्करयेऊन पडले.२७ दिवसांपासून मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याबाबत आम्ही विधिमंडळ सभागृहात आक्रमक भूमिका मांडू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.तरतुदींना स्थगिती दिलेली नाहीफडणवीस म्हणाले की, मराठा समाजाच्या तरुणांना कायद्यातील तरतुदींनुसार नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने एकमताने संमत केला होता. न्यायालयानेही अद्याप हा कायदा अमान्य केलेला नाही. उपोषणाला बसलेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाल्या पाहिजेत.कायद्यातील तरतुदींप्रमाणे सरकारने कार्यवाही करणे आवश्यक आहे. हा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही तरतुदींना कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस