वसईतील नैसर्गिक स्त्रोत्र आटले

By Admin | Updated: April 29, 2016 04:49 IST2016-04-29T04:49:41+5:302016-04-29T04:49:41+5:30

एखाद्या डोहात मुक्त पोहावे अशी कल्पना फक्त वसई ग्रामीण भागातील नागरीकांच्या व बालकांच्या केवळ स्वप्नातच राहणार.

The natural sources of Vasai came | वसईतील नैसर्गिक स्त्रोत्र आटले

वसईतील नैसर्गिक स्त्रोत्र आटले

पारोळ : वसई तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असताना एखाद्या डोहात मुक्त पोहावे अशी कल्पना फक्त वसई ग्रामीण भागातील नागरीकांच्या व बालकांच्या केवळ स्वप्नातच राहणार. कारण गेल्या वर्षी वरूण राजाने आखडता हात घेतल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे स्त्रोत असलेले नद्या, डोह, ओहोळ, जंगलातील पाणवठे या मधील पाणी आटल्याने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुके झाले आहेत.
या पाण्याच्या टंचाईमुळे तुंगारेश्वर अभयारण्याच्या परीसरातील गावांमध्ये वन्यजीव पाण्याच्या शोधात शिरण्याचा धोका वाढला आहे. तसेच गाई, बैलांना पाजायला पाणी आणायचे कुठून हा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. यावर्षी सर्व नदीनाले सुके पडल्याने पाण्यातील माशांच्या जातीही नष्ट होणार आहेत.
तुंगारेश्वरच्या वन्य जीवांचा धोका वाढल्याने वनविभागाकडून तसा आढावा घेण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The natural sources of Vasai came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.