शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गुंतवणुकीच्या विरोधात व्यापा-यांचा शुक्रवारी देशव्यापी बंद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:27 IST

वॉलमार्ट, अमेझॉन व अन्य परदेशी कंपन्यांच्या हातात सर्व व्यापार जावून त्यांची मक्तेदारी निर्माण होईल.यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामुळे व्यापारी रस्त्यांवर  : पोपटलाल ओत्सवाल

पुणे: देशात वॉलमार्ट फ्लीपकार्ड सारख्या परदेशी कंपन्यांना केंद शासनाने रिटेल क्षेत्रात शंभर टक्के गुंतवणूक करण्यास परवानगी दिली आहे. या परदेशी कंपन्यांची व्यापार विषयक ताकद मोठी असून, देशातील लहान मोठे व्यापारी टिकाव धरु शकणार नाही. यामुळे व्यापारात असमतोल आणणा-या परकीय गुंतवणुकीच्या विरोधात दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने येत्या शुकवारी (दि.२८) रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे.    याबाबत दि पूना मर्चंटस् चेंबर चे अध्यक्ष पोपटलाल ओत्सवाल यांनी सांगितले की, केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांत अनेक चुकीची धोरण राबवली असून यामुळे व्यापारी रस्त्यांवर आले आहेत. वॉलमार्ट पाठोपाठ ई कॉमर्स मधील अमेझॉनने नुकत्याच आदित्य बिर्ला समुहाचे मोअर, सुपर मार्केट खरेदी करुन किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. या कंपन्या नुकसान सहन करून बाजारावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासमोर छोटे व मध्यम व्यापारी तग धरु शकणार नाहीत व एकदा स्पर्धा संपल्यावर या  परदेशी कंपन्या मनमानी भाववाढ करतील व सर्व व्यापा-यांची सुत्रे त्यांच्या हातात जातील. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.     देशात ईस्ट इंडिया कंपनीने जसा व्यापार काबीज केला तसाच आता वॉलमार्ट, अमेझॉन व अन्य परदेशी  कंपन्यांच्या हातात सर्व व्यापार जावून त्यांची मक्तेदारी निर्माण होईल. त्यामुळे उत्पादक शेतकरी असो अथवा कारखानदार, ग्राहक यांना मक्तेदार सांगतील त्याप्रमाणे विक्री वा खरेदी करणे भाग पडेल. यामुळेच व्यापारात असमतोलता साधना-या शासनाच्या धोरणांच्या विरोधात व्यापा-यांनी रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी येत्या २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंदाची घोषणा करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायCentral Governmentकेंद्र सरकार