विश्वास ठरावावेळी राष्ट्रवादी अनुपस्थित राहणार
By Admin | Updated: October 28, 2014 01:51 IST2014-10-28T01:51:29+5:302014-10-28T01:51:29+5:30
भाजपाचे नवे सरकार विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाईल तेव्हा राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहतील,
विश्वास ठरावावेळी राष्ट्रवादी अनुपस्थित राहणार
शरद पवारांची भूमिका : बहुमतासाठी शिवसेनेच्या कुबडय़ांची भाजपाला गरज नाही
मुंबई : भाजपाचे नवे सरकार विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाईल तेव्हा राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनुपस्थित राहतील, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे बहुमतासाठी शिवसेनेच्या कुबडय़ांची आता भाजपाला गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही भाजपाला विश्वासदर्शक ठरावावेळी पाठिंबाही देणार नाही आणि विरोधही करणार नाही. आमचे सदस्य अनुपस्थित राहतील. सहा महिन्यांत राज्यावर पुन्हा निवडणूक लादायची नसेल आणि स्थिर सरकार द्यायचे असेल तर आमची भूमिका योग्यच आहे. भाजपा-शिवसेना एकत्र आले तर स्थिर सरकार देऊ शकतील; पण तशी शक्यता दिसत नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
पक्षातील फूट टाळण्यासाठी?
शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या काही मंत्र्यांची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी टाळण्यासाठी भाजपाला पाठिंबा देऊ केल्याची जोरदार चर्चा असताना आणखी एक कारण समोर आले आहे. भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊन पवार यांनी आपल्या पक्षातील संभाव्य फूट टाळल्याचे म्हटले जाते.
तेव्हा ‘ते’ झोपले होते का ?
आपण भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपा-राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे; भ्रष्टाचाराप्रकरणी माजी मंत्र्यांचा बचाव करण्याची धडपड चालविल्याचा आरोप केला होता, यावर पवार म्हणाले, चव्हाण स्वत: पावणोचार वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते झोपले होते का?
पवारांची भूमिका दुर्दैवी
स्थिर सरकारच्या नावाखाली भाजपाच्या सरकारला पाठिंबा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीच्या खात्यांमधील गडबडींकडे कानाडोळा केला नाही. उलट चौकशी करून सत्य बाहेर आणण्याचाच प्रय} केला.