राष्ट्रवादीच्या १३१ उमेदवारांची यादी

By Admin | Updated: September 27, 2014 05:12 IST2014-09-27T05:12:43+5:302014-09-27T05:12:43+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री विधानसभेच्या १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक उमेदवारांनी शुक्रवार सकाळपासून उमेदवारी अर्ज भरले.

Nationalist list of 131 candidates | राष्ट्रवादीच्या १३१ उमेदवारांची यादी

राष्ट्रवादीच्या १३१ उमेदवारांची यादी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री विधानसभेच्या १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक उमेदवारांनी शुक्रवार सकाळपासून उमेदवारी अर्ज भरले. पहिल्या यादीतील दिग्गजांमध्ये अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील, मनोहर नाईक, अनिल देशमुख, राजेश टोपे, हसन मुश्रीफ, जयदत्त क्षीरसागर, गणेश नाईक आदींचा समावेश आहे.
माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना डच्चू देण्यात आला आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांच्या कन्या भाग्यश्री, माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या सून नमिता असा नेत्यांच्या नातेवाइकांचा गोतावळा यादीमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय दिना पाटील, विजय भांबळे, काँग्रेसचे माजी आमदार ध्रुपतराव सावळे, भाजपाचे माजी आमदार राजकुमार पटेल, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीतून आलेल्या रेखाताई खेडेकर, लोकसभेत पराभूृत झालेले कृष्णराव इंगळे यांच्या कन्या माजी नगराध्यक्ष स्वाती वाकेकर यांनाही संधी देण्यात आली आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र समीर, गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संदीप नाईक अशा पिता-पुत्राच्या जोड्याही आहेत. भाजपा युवा मोर्चाच्या राज्य अध्यक्ष पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांना मैदानात उतरवले आहे. (विशेष प्रतिनिधी)

१) अक्कलकुवा - विजय पराडके
२) शहादा - राजेंद्र गावित
३) नंदुरबार - विकास वळवी
४) नवापूर - शरदकुमार गावित
५) साक्री - दिलीप नाईक
६) धुळे ग्रामीण - किरण पाटील
७) धुळे शहर - राजवर्धन कदमबांडे
८) शिंदखेडा - संदीप बेडसे
९) शिरपूर - जयवंत पाडवी
१0) अमळनेर - कृषीभूषण साहेबराव पाटील
११) एरंडोल - डॉॅ.सतीश पाटील
१२) चाळीसगाव - राजीव देशमुख
१३) पाचोरा - दिलीप वाघ
१४) जामनेर - दिगंबर पाटील
१५) बुलडाणा - नरेश शेळके
१६) चिखली - ध्रुपतराव सावळे
१७) सिंदखेडराजा - रेखाताई खेडेकर
१८) मेहकर - मंदाकिनी कंकाळ
१९) खामगाव - नानाभाऊ कोकरे
२0) जळगाव जामोद - स्वाती वाकेकर
२१) अकोला पूर्व - शिरीष धोत्रे
२२) रिसोड - बाबाराव पाटील (खडसे)
२३) मेळघाट - राजकुमार पटेल
२४) मोर्शी - हर्षवर्धन देशमुख
२५) वर्धा - सुरेश देशमुख
२६) काटोल - अनिल देशमुख
२७) हिंगणा - रमेश बंग
२८) गडचिरोली - भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम
२९) अहेरी - धर्मरावबाबा आत्राम
३0) ब्रह्मपुरी - संदीप गड्डमवार
३१) वणी - संजय देरकर
३२) यवतमाळ - संदीप बाजोरिया
३३) पुसद - मनोहर नाईक
३४) किनवट - प्रदीप जाधव
३५) लोहा - शंकर धोंडगे
३६) नायगाव - श्रीनिवास देशमुख
३७) वसमत - जयप्रकाश दांडेगावकर
३८) कळमनुरी - शिवाजीराव माने
३९) हिंगोली - दिलीप चव्हाण
४0) जिंतूर - विजय भांबळे
४१) परभणी - प्रताप देशमुख
४२) गंगाखेड - मधुसुदन केंद्रे
४३) घनसावंगी - राजेश टोपे
४४) बदनापूर - बबलू चौधरी
४५) भोकरदन - चंद्रकांत दानवे
४६) कन्नड - उदयसिंह राजपूत
४७) फुलंब्री - अनुराधा चव्हाण
४८) औरंगाबाद मध्य - विनोद पाटील
४९) पैठण - संजय वाकचौरे
५0) गंगापूर - कृष्णा डोणगावकर
५१) वैजापूर - भाऊसाहेब चिकटगावकर
५२) गेवराई - बदामराव पंडित
५३) माजलगाव - प्रकाश सोळंके
५४) बीड - जयदत्त क्षीरसागर
५५) आष्टी - सुरेश धस
५६) केज - नमिता मुंदडा
५७) परळी - धनंजय मुंडे
५८) अहमदपूर - बाबासाहेब पाटील
५९) उद्गीर - संजय बन्सोडे
६0) निलंगा - बसवराज नागराळकर
६१) औसा - राजेश्वर बुके
६२) उमरगा - संजय गायकवाड
६३) उस्मानाबाद - राणा जगजितसिंह पाटील
६४) परांडा - राहुल मोटे
६५) नांदगाव - पंकज भुजबळ
६६) मालेगाव मध्य - मुफ्ती मोहम्मद इस्माईल
६७) कळवण - ए.टी.पवार
६८) येवला - छगन भुजबळ
६९) निफाड - दिलीप बनकर
७0) नाशिक पूर्व - देविदास पिंगळे
७१) इगतपुरी - हिरामण खोसेकर
७२) विक्रमगड - सुनील भुसारा
७३) भिवंडी ग्रामीण - महादेव घाटाळ
७४) शहापूर - पांडुरंग बरोरा
७५) भिवंडी पश्चिम - अब्दुल रशीद ताहीर मोमीन
७६) कल्याण पश्चिम - संजय पाटील
७७) कल्याण पूर्व - निलेश शिंदे
७८) मीरा भार्इंदर - गिल्बर्ट मेन्डोंसा
७९) ओवळा-माजीवडा - हनमंत जगदळे
८0) ठाणे - निरंजन डावखरे
८१) मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड
८२) ऐरोली - संदीप नाईक
८३) बेलापूर - गणेश नाईक
८४) विक्रोळी - संजय दिना पाटील
८५) वर्सोवा - नरेंद्र वर्मा
८६) अणुशक्ती नगर - नवाब मलिक
८७) सायन कोळीवाडा - प्रसाद लाड
८८) वरळी - सचिन अहीर
८९) कर्जत - सुरेश लाड
९0) श्रीवर्धन - अवधूत तटकरे
९१) आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
९२) दौंड - रमेश थोरात
९३) इंदापूर - दत्ता भरणे
९४) बारामती - अजित पवार
९५) अकोले - वैभव पिचड
९६) संगमनेर - आबासाहेब थोरात
९७) श्रीरामपूर - प्रा.सुनीता गायकवाड
९८) नेवासा - शंकरराव गडाख पाटील
९९) शेवगाव - चंद्रशेखर घुले
१00) पारनेर - सुजित झावरे
१0१) अहमदनगर शहर - संग्राम जगताप
१0२) श्रीगोंदा - राहुल जगताप
१0३) करमाळा - रश्मी बागल
१0४) माढा - बबन शिंदे
१0५) बार्शी - दिलीप सोपल
१0६) मोहोळ - रमेश कदम
१0७) सोलापूर शहर उत्तर - मनोहर सपाटे
१0८) सोलापूर मध्य - विद्या लोलगे
१0९) अक्कलकोट - मल्लिकार्जून पाटील
११0) सोलापूर दक्षिण - बाळासाहेब शेळके
१११) पंढरपूर - चंद्रकांत बागल
११२) माळशिरस - हनुमंत डोळस
११३) फलटण - दीपक चव्हाण
११४) वाई - मकरंद पाटील
११५) कोरेगाव - शशिकांत शिंदे
११६) कराड उत्तर - श्यामराव पाटील
११७) पाटण - सत्यजितसिंह पाटणकर
११८) सातारा - छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले
११९) दापोली - वसंत कदम
१२0) गुहागर - भास्कर जाधव
१२१) चिपळूण - शेखर निकम
१२२) कुडाळ - पुष्पसेन सावंत
१२३) सावंतवाडी - सुरेश दळवी
१२४) चंदगड - संध्यादेवी कुपेकर
१२५) राधानगरी - के.पी.पाटील
१२६) कागल - हसन मुश्रीफ
१२७) इस्लामपूर - जयंत पाटील
१२८) शिराळा - मानसिंग नाईक
१२९) खानापूर - अमरसिंह देशमुख
१३0) तासगाव-कवठे महांकाळ - आर.आर.पाटील

Web Title: Nationalist list of 131 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.