‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची रत्नागिरीकडे पाठ!
By Admin | Updated: October 10, 2014 05:30 IST2014-10-10T05:30:46+5:302014-10-10T05:30:46+5:30
तुटलेली युती आणि फुटलेली आघाडी’ अशा स्थितीत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे पाठ फिरविली

‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची रत्नागिरीकडे पाठ!
रत्नागिरी : ‘तुटलेली युती आणि फुटलेली आघाडी’ अशा स्थितीत सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अटीतटीची लढत होत असतानाही उमेदवार एकाकी पद्धतीने लढा देत असल्याचे चित्र आहे़
गुहागरमधील भास्कर जाधव आणि रत्नागिरीतील उदय सामंत असे दोन मंत्री राष्ट्रवादीकडून रत्नागिरी जिल्ह्याला देण्यात आले. मात्र, उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळेच वरिष्ठ नेत्यांकडून रत्नागिरीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीकडून रत्नागिरी मतदारसंघासाठी उदय सामंत यांची उमेदवारी निश्चित होती. त्यांच्या नावाचा पक्षाचा ‘बी’ फॉर्मही तयार होता. मात्र, अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला.