राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही
By Admin | Updated: October 26, 2014 01:20 IST2014-10-26T01:20:30+5:302014-10-26T01:20:30+5:30
राज्यात राष्ट्रवादीने मोठय़ा प्रमाणात केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठीच बिनशर्त भाजपाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही.
राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही
पंढरपूर (जि. सोलापूर): राज्यात राष्ट्रवादीने मोठय़ा प्रमाणात केलेला भ्रष्टाचार उघड होऊ नये यासाठीच बिनशर्त भाजपाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही. सरकार स्थापनेनंतर या अगोदर संघटनेने केलेल्या तक्रारींची चौकशी होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.
विधानसभा निवडणुकीत संघटनेत पडलेली फूट व आगामी ऊस दर आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर शेट्टी यांनी शनिवारी पंढरपुरात कार्यकत्र्याची बैठक घेतली.
पराभवाने खचून न जाता संघटनेची नव्याने पुनर्बाधणी करून आंदोलनाची तयारी करणार आहे. संघटनेची 13 वी ऊस परिषद 1 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये यावर्षीच्या ऊस आंदोलनाची दिशा व दराची घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
उमेदवारांचे बिल्ले गायब
संघटनेने साखर कारखानदारांना उमेदवारी दिल्यामुळे जिलतील संघटनेत फुट पडली आहे. यानंतर खा. राजू शेट्टींच्या हस्ते उमेदवारांनी संघटनेचे बिल्ले लावून अधिकृत प्रवेश केल्याची घोषणा केली. मात्र निवडणुकीनंतर या उमेदवारांनी लावलेले बिल्ले काढल्याचीच चर्चा कार्यकत्र्यामध्ये सुरू होती.