कोल्हापुरात सोमवारी राष्ट्रीय साखर परिषद
By Admin | Updated: October 10, 2014 23:51 IST2014-10-10T23:51:22+5:302014-10-10T23:51:22+5:30
‘भारतीय शुगर’ ही संस्था १९७५ पासून देशपातळीवर कार्यरत

कोल्हापुरात सोमवारी राष्ट्रीय साखर परिषद
कोल्हापूर : ‘भारतीय शुगर’ यांच्यावतीने देशपातळीवरील सहकारी व खासगी साखर कारखान्यांसाठी राष्ट्रीय साखर परिषदेचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही परिषद होणार असल्याची माहिती ‘भारतीय शुगर’चे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप. शुगर’चे संचालक व ‘शिवशक्ती शुगर’चे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे (बेळगाव) यांना यंदाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
‘भारतीय शुगर’ ही संस्था १९७५ पासून देशपातळीवर कार्यरत आहे. साखर परिषदेचे उद्घाटन सोमवारी सकाळी दहा वाजता पोलीस महानिरीक्षक संजीव पटजोशी यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी देशातील विविध ऊस संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. साखर उद्योगातील तज्ज्ञ मंडळी तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संग्रामसिंह शिंदे, कर्नल एस. जी. दळवी, डी. एस. गुरव, प्रा. अविनाश मुद्योळकर, आदी उपस्थित होते.