भुसावळ ( जि. जळगाव) : एम़आय़तेली इंग्लिश मीडियम स्कूलची नववीची विद्यार्थिनी मसीरा बी़हनीफ पटेल हिला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बालदिनी नवी दिल्लीत राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े हा पुरस्कार मिळवणारी मसीरा ही राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आह़े यापूर्वीदेखील तिला व तिचा भाऊ उस्मान यास विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आह़े
अहमदाबाद येथे 2क्13 मध्ये झालेल्या बाल वैज्ञानिक शोध स्पर्धेत मसीरा हिने 26 नाविण्यपूर्ण वैज्ञानिक प्रयोग सादर केले होत़े त्यातील ह्यदुचाकीला वातानुकूलित यंत्रणा या प्रकल्पाची निवड झाली होती तर उस्मान याने ह्यलोटगाडीला हाताद्वारे ब्रेक हा प्रयोग सादर केला होता़
या प्रयोगांची दखल घेत माजी राष्ट्रपती डॉ़एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते या भावंडांना बालवैज्ञानिक पुरस्काराने गौरविण्यात आले होत़े (प्रतिनिधी)
नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात भारतातून 2क् जणांना पुरस्काराने गौरविण्यात आल़े चांदीचे पदक, प्रमाणपत्र व दहा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
राष्ट्रपती भवन पाहिल्यावर समाधान वाटल़े खुप मान-सन्मान मिळाला, चांगला अनुभव आला़
- मसीरा पटेल,
पुरस्कारप्राप्त विद्यार्थिनी