शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’, २७ नोव्हेंबरला आंदोलन : नागपूरला होणार समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 04:12 IST

भाजपा सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सातारा ते कराड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.

मुंबई : भाजपा सरकारच्या जनहितविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सातारा ते कराड अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन केले जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शेतकºयांची प्रत्यक्षातील कर्जमाफी आणि कर्जमाफी मध्ये असलेली तफावत, राज्यातील युवकांना दरवर्षी रोजगाराची आमिषे, राज्यातील महिलांना वाटणारी असुरक्षितता आणि त्यामुळे राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, सांगलीत पोलिसांनीच आरोपीचा खून करणे यामुळे पोलिसांवरचा उडालेला विश्वास व इतर मुलभुत प्रश्नांवर भाजपाचे सरकार अपयशी ठरले असून सरकारच्याविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.राज्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यायातून १ डिसेंबर ते १० डिसेंबर दिंडी-पदयात्रा काढण्यात येणार आहे. १४५ किलो मिटरची ही पदयात्रा दिनांक ११ डिसेंबर रोजी विधानभवन नागपूर येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित रहणार आहेत. पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातून सुरु होवून पवना-वर्धा मार्गे नागपूरला संपेल.या पदयात्रेत विधीमंडळ नेते अजित पवार, विधीमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.शरद पवार राहणार उपस्थित-सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी हल्लाबोल आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. ते ११ डिसेंबर रोजी विधानभवन नागपूर येथे पोहोचणार आहेत. त्या ठिकाणी पक्षाचे राष्टीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार