नासुप्रकडे कोट्यवधीची थकबाकी
By Admin | Updated: August 25, 2014 01:10 IST2014-08-25T01:10:12+5:302014-08-25T01:10:12+5:30
शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी नागपूर सुधार प्र्रन्यास(नासुप्र)ची स्थापना करण्यात आली आहे. परंतु नासुप्रच्या विविध कार्यालयावर कोट्यवधीचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने खरोखरच ही

नासुप्रकडे कोट्यवधीची थकबाकी
मालमत्ता कर : कर भरण्याबाबत प्रशासन उदासीन
नागपूर : शहराचा नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी नागपूर सुधार प्र्रन्यास(नासुप्र)ची स्थापना करण्यात आली आहे. परंतु नासुप्रच्या विविध कार्यालयावर कोट्यवधीचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने खरोखरच ही जबाबदारी पार पाडली जाते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
थकबाकीसंदर्भात महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही नासुप्रने कर भरलेला नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून ही बाब उघडकीस आली आहे.
नासुप्रच्या विविध कार्यालयाकडे २,९६,२९६२९ चा मालमत्ता कर थकीत आहे. शहरातील १५० मालमत्ताधाकांकडे १०० कोटींचा कर थकबाकी आहे. गेल्या वर्षात मालमत्ता विभागाने १८९ कोटींची वसुली केली होती.
वित्त वर्षात विभागाला मनपाने २५० कोटी्रच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. परंतु विभागाचा कारभार लक्षात घेता उद्दिष्ट गाठणे अवघड आहे. ई-गव्हर्नस यंत्रणेमुळे जुन्या बिलाचा भरणा करताच संबंधिताना वित्त वर्षाचे देयक देण्याचा दावा सत्तापक्षाने केला होता. परंतु साडेचार महिन्यानंतर हजारो ग्राहकांना देयके मिळालेली नाही.
दोन आठवड्यापूवीं साडेचार लाख लोकांना डिमांड नोट पाठविण्याचे निर्देश दिले होते. परंतु या निर्देशाचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर ४० हजार देयके पाठविण्यात आलेली आहेत.
यासाठी मनपा प्रशासन कुरिअर कंपनीची मदत घेत आहे. असे असतानाही मालमत्ताधारकांना देयके मिळत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)