त्र्यंबकेश्वर तालुक्यात शाळेचे पेपर सुरू असताना विज कोसळून दोन विद्यार्थी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:44 IST2017-10-10T17:39:36+5:302017-10-10T17:44:21+5:30

nashik,trmabak,Two,students,critically,injured | त्र्यंबकेश्वर तालुक्यात शाळेचे पेपर सुरू असताना विज कोसळून दोन विद्यार्थी गंभीर जखमी

त्र्यंबकेश्वर तालुक्यात शाळेचे पेपर सुरू असताना विज कोसळून दोन विद्यार्थी गंभीर जखमी

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड घटनाकर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयजखमींवर हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार

नाशिक : शाळेच्या प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना वर्गावर अचानक वीज कोसळून दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे घडली़ यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी असे दोघे गंभीर भाजले असून त्यांना हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड येथे कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय आहे़ या विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची लेखी परीक्षा सुरू असून मंगळवारी दुपारच्या सुमारास नववीचे विद्यार्थी नेहेमीप्रमाणे पेपर सोडवित होते़ पेपर सुरू असताना आकाशात अचानक ढगांचा कडकडाट सुरू होऊन पावसास सुरूवात झाली़ यावेळी शाळेतील नववीच्या वर्गातील खोलीत पेपर सोडवित असलेले विमल सदू खानझोडे (१५, मूळ मु़ वरसईल, पो खरवळ, ता़त्र्यंबकेश्वर जि़नाशिक) व महेश नामदेव चौधरी (१५, मु़निरगुडे, पो़हरसूल, ता़त्र्यंबकेशवर जि़नाशिक) या दोघांवर अचानक विज कोसळली़
शाळेतील नववीच्या वर्गावर विज कोसळल्याने भाजलेल्या विमल खानझोडे व महेश चौधरी या दोघांना शालेय व्यवस्थापनाने तत्काळ हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून या दोघांवर उपचार सुरू आहेत़ दरम्यान, या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले़

Web Title: nashik,trmabak,Two,students,critically,injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.