शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सटाण्यातील चौदा लाखांच्या दरोड्याची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 15:28 IST

नाशिक : सटाणा तालुक्यातील तेलदर शिवारात दरोडा टाकून दाम्पत्यास जबर मारहाण केल्यानंतर चौदा लाखांची लूट करणाºया चार दरोडेखोरांना सटाणा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून सोमवारी (दि़२० अटक केली़ सोमनाथ गुलाब पवार (३७, रा़जाखोड, सटाणा), दयाराम नामदेव पवार (४५, रा़दसाने,सटाणा) सुनील गोरख काळे (२०,गारखेडा, जि़औरंगाबाद) व आकाश लक्ष्मण ...

ठळक मुद्देतेलदर शिवारातील घटना ; चौघा दरोडेखोरांना अटक पती-पत्नीस मारहाण करून चौदा लाखांची लूटसटाणा व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नाशिक : सटाणा तालुक्यातील तेलदर शिवारात दरोडा टाकून दाम्पत्यास जबर मारहाण केल्यानंतर चौदा लाखांची लूट करणाºया चार दरोडेखोरांना सटाणा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून सोमवारी (दि़२० अटक केली़ सोमनाथ गुलाब पवार (३७, रा़जाखोड, सटाणा), दयाराम नामदेव पवार (४५, रा़दसाने,सटाणा) सुनील गोरख काळे (२०,गारखेडा, जि़औरंगाबाद) व आकाश लक्ष्मण चव्हाण (२३, गारखेडा, जि़औरंगाबाद) असे अटक केलेल्या चौघा दरोडेखोरांची नावे आहेत़ उर्वरीत साथीदारांचा ग्रामीण पोलीस शोध घेतल आहेत़ विशेष म्हणज दरोड्याचा कट रचणारा प्रमुख संशयित हा दसाने गावातीलच असल्याचे तपासात समोर आले आहे़३० आॅक्टोबर २०१७ रोजी सटाणा तालुक्यातील दसाने गावात तेलदर शिवारातील केवळ खैरनार व त्यांची पत्नी सुशिलाबाई खैरनार हे रात्रीच्या सुमारास झोपलेले असताना सात - आठ दरोडेखोरांनी त्यांच्या दरवाजाची लोखंडी जाळीची कडी तोडून घरात प्रवेश केला़ तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांडके व हत्यारांनी खैरनार दाम्पत्यास जबर मारहाण करून १२ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज दरोडा टाकून लूटून नेला होता़ ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती़ तसेच याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़दरोड्यातील जखमी दाम्पत्याने तपासामध्ये दरोडेखोर हे अहिराणी व डांगी भाषा बोलत असल्याची माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना दिली होती़ त्यानुसार गुप्त बातमीदारांमार्फत परिसरात तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी केल्यानंतर सटाणा परिसरातील संशयित सोमनाथ पवार यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने दरोड्याची कबुली दिली तसेच आपल्या साथीदारांची नावेही सांगितली़ दरोड्यातील दयाराम पवार यास साक्री, तर सुनील काळे व आकाश चव्हाण यांना सापळा रचून औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले़ संशयित सर्व सराईत असून त्यांच्याकडून सटाणा, देवळा व मालेगाव परिसरताील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ग्रामीण पोलीस अधीक्षक व वरीष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आश्षि आडसूळ, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, दीपक पवार, स्वप्निल नाईक, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी शिलावट, अरूण पगारे, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दीपक अहिरे, अशोक जगताप, रवी वानखेडे, नामदेव खैरनार, सुनील पानसरे, पोलीस नाईक अमोल घुगे, राजू सांगळे, संदीप हांडगे, पोलीस शिपाई प्रदीप बहिरम, हेमंत गिलबिले, गणेश पवार, चालक राजू वायकांडे, योगेश गुमलाडू, भूषण रानडे, सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जिभाऊ पवार, मन्साराम बागूल, रविंद्र भामरे, देवराम खांडवी, पुंडलीक डंबाळे, प्रकाश श्ािंदे, पोलीस शिपाई विजय वाघ, योगेश गुंजाळ, संदीप गांगुर्डे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला़दसानेतील पवार दरोड्याचा प्रमुख सूत्रधारपोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित दयाराम पवार हा दसाने परिसरातीलच रहिवासी असून त्यास गावातील प्रगतीशील शेतकºयांची संपूर्ण माहिती होती़ त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील संशयित सुनील काळे , आकाश चव्हाण व त्यांचे साथीदारांना सटाण्याला बोलावून घेऊन खैरनार यांच्या घरावरील दरोड्याचा कट रचला होता़ तर संशयित सोमनार पवार हा एक ते दीड वर्षांपासून दयाराम पवारच्या संपर्कात असून परिसरातील सधन शेतकºयांची माहिती घेत होता़