शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक अवैध शस्त्रसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 19:13 IST

नाशिक : अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर शहर व जामखेड येथील खूनाच्या घटनेची विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दखल घेऊन परिक्षेत्रात अवैध शस्त्रसाठा मोहिम राबविण्यात आली़ यामध्ये परिक्षेत्रातील जळगाव व नगर जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे़

ठळक मुद्देनाशिक परिक्षेत्र : अवैध शस्त्राचे ६१ गुन्हे ७८ आरोपी : १० पिस्टल १९ कट्टे

नाशिक : अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर शहर व जामखेड येथील खूनाच्या घटनेची विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दखल घेऊन परिक्षेत्रात अवैध शस्त्रसाठा मोहिम राबविण्यात आली़ यामध्ये परिक्षेत्रातील जळगाव व नगर जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे़

परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव,नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी ६९ गुन्हे दाखल असून ९४ शस्त्र जप्त केली आहेत. यामध्ये १० पिस्टल, १९ गावठी कट्टे, ५४ काडतुसे, ४५ तलवारी, ५ चाकू, प्रत्येकी ४-४ कोयते, चॉपर तसेच २ सुऱ्यांसह कटर, कुºहाड, गुप्ती असे प्रत्येकी १-१ शस्त्रांचा समावेश आहे़ याबरोबरच पोलिसांनी चार वाहने, पाच निकामी काडतूसे व एक डबर बोर बंदुकही जप्त केली आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांनी दिलेल्या आदेशानुसार नाशिक परिक्षेत्रात ३ मे पासून अवैध शस्त्रसाठा मोहिम सुरू करण्यात आली़ या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली होती़ या मोहिमेत पाच जिल्ह्यांमध्ये अवघ्या बारा दिवसांत अवैध शस्त्रसाठ्याचे ६१ गुन्हे दाखल करून ७८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.जिल्हानिहाय जप्त केलेला शस्त्रसाठा-----------------------------------------------------------------------------------------------------जिल्हा                 दाखल गुन्हे           संशयित संख्या            शस्त्रास्त्रांची माहिती-----------------------------------------------------------------------------------------------------नाशिक ग्रामीण       ११                          ११                    ३ गावठी कट्टे,२ काडतुसे, १४ धारदार शस्त्रेधुळे                       ११                           ११                    १ पिस्टल, ७ गावठी कट्टे, १० काडतुसे, ११ धारदार शस्त्रेजळगाव              २६                        ३६                    ३ पिस्टल, ४ कट्टे, २९ काडतुसे, २२ धारदार शस्त्रेनंदुरबार                ०३                          ०४                     २ पिस्टल, ४ तलवारअहमदनगर         १८                        ३२                     ४ पिस्टल, ५ गावठी कट्टे, १३ काडतुसे, १२ धारदार शस्त्रे-----------------------------------------------------------------------------------------------------एकूण                   ६९                       ९४                    १० पिस्टल, १९ कट्टे, ५४ काडतुसे, ६३ धारदार शस्त्रे, १डबल बोर बंदुक

 

२५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर बक्षीस

नाशिक परिक्षेत्रातील अहमदनगर, जामखेड या ठिकाणी अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून केलेल्या खूनाच्या घटनेनंतर घातक शस्त्र बाळगणाºयांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते़ त्यानुसार परिक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली आहे़ नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यास संबंधिताचे नाव गुप्त ठेवले जाईल़ तसेच यशस्वी कारवाई झाल्यास २५ हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर बक्षीसही दिले जाईल़- विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा