शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या नाशिकमधील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 17:40 IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ आदेश गजेंद्र चोपडे (२१, रा़ २४२, ऋषीप्रसाद बंगला, खुटवडनगर, सीटू भवनजवळ, नाशिक) व चिन्मय दीपक अटराव्हलकर (२२, चतुर्थ वर्ष, आयटी, वाघ महाविद्यालय) अशी वेबसाईट हॅक प्रकरणात अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़

ठळक मुद्देबीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीचे विद्यार्थी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे़ आदेश गजेंद्र चोपडे (२१, रा़ २४२, ऋषीप्रसाद बंगला, खुटवडनगर, सीटू भवनजवळ, नाशिक) व चिन्मय दीपक अटराव्हलकर (२२, चतुर्थ वर्ष, आयटी, वाघ महाविद्यालय) अशी वेबसाईट हॅक प्रकरणात अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बीएससी द्वितीय वर्षातील लेखाकृती बीजगणित या विषयाचा पुणे, नगर व नाशिक येथे २८ एप्रिल रोजी पेपर होता़ मात्र, २७ एप्रिल रोजी रात्रीच हा पेपर सोशल मीडिया (व्हॉट्स अ‍ॅपवर) व्हायरल झाला व दुसºया दिवशीचा पेपर व व्हायरल झालेला पेपर हा तंतोतंत सारखाच होता़ विद्यपीठ अधिसभा सदस्य अमित पाटील व त्यांचे शिष्टमंडळ तसेच नाशिकमधील आमआदमी पार्टीचे जितेंद्र भावे यांनी पुणे विद्यापीठ उपकेंद्रातील कनिष्ठ सहायक योगेश सोनार यांच्याकडे पेपरफुटीबाबत निवेदन देऊन तक्रार केली़ बिटको महाविद्यालयात जाऊन व्हायरल प्रश्नपत्रिकेची खातरजमा करण्यात आली व तेथील प्राचार्यांनीही प्रश्नपत्रिका ही सारखीच असल्याचे विद्यापीठास मेलद्वारे कळविले होते़

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ नितीन करमळकर यांनी केटीएचएमचे प्राचार्य डॉ़ व्ही़ बी़ गायकवाड, हिरे महाविद्यालयाचे प्राध्यापक ए़ व्ही़ पाटील, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ़ राजेंद्र तलवारे यांची त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती़ या समितीने शहरातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर क़ का़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीचे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी चोपडे व अटराव्हलकर यांनी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून मिळविल्याचे समोर आले़ त्यांनी विद्यापीठाची वेबसाईट कशाप्रकारे हॅक केली व प्रश्नपत्रिका मिळविली हे लेखी स्वरूपात लिहून दिले़ या त्रिसदस्यीय समितीने विद्यापीठास कळविल्यानंतर वेबसाईट हॅक करून सोशल मीडियावरून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाºया विद्यार्थ्यांविरोधात विद्यापीठाने पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला़

विद्यापीठाच्या निर्णयानुसार विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्रातील कनिष्ठ सहायक योगेश सोनार (नाशिकरोड) यांनी शहर सायबर पोलीस ठाण्यात रविवारी (दि़६) फिर्याद दिली़ संशयित विद्यार्थी चोपडे व अटराव्हलकर या दोघांवरही माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे़ या दोघांनाही सोमवारी (दि़७) न्यायालयात हजर करण्यात आले असून, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

टॅग्स :NashikनाशिकPuneपुणेuniversityविद्यापीठ